-----------------
जामदरा घोटी प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित
वाशिम: मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे उभारलेल्या सिंचन प्रकल्पाच्या गेटमधून पाणी वाहून गेल्याने काठोकाठ भरलेला हा प्रकल्प उन्हाळ्यापूर्वीच आटला. वर्षभरापासून दुरुस्तीच न केल्याने हा प्रकार घडला असून, अद्यापही या प्रकल्पाची दुरुस्ती झालेली नाही.
----------------
बंद पडलेले हातपंप सुरु करावेत !
वाशिम: कारंजा तालुक्यातील अनेक गावांतील हातपंप मागील बऱ्याच महिन्यांपासून बंद आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून हे हातपंप दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केली आहे.
-------------
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम: सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून कारंजा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवारी करण्यात आली.
------------
आरोग्य विषयक माहितीचे संकलन
वाशिम: ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सहकार्य करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम समिती स्थापन करण्यात आली आहे. इंझोरीत या समितीकडून शुक्रवारी ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली.
------