शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
2
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
6
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
7
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
8
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
9
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
10
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
12
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
13
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
14
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
16
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
17
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
18
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
19
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
20
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

तूर साठवणुकीसाठी अपुरी जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:20 AM

वाशिम: शासकीय खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी ३१ मे २0१७ पर्यंत टोकन घेतलेल्या शेतकर्‍यांची तूर मोजून घेण्यास राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंंत मुदतवाढ दिली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कें द्रांवर बाजार समिती हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर मोजणी सुरूही झाली आहे; परंतु ही तूर साठविण्यासाठी वखार महामंडळांच्या गोदामात पुरेशी जागाच नसल्याने येत्या दोन दिवसांतच ही खरेदी संकटात येण्याची शक्यता आहे.  

ठळक मुद्देजिल्ह्यातील वास्तवशासकीय खरेदीवर संक्रांततूर मोजून घेण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासकीय खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी ३१ मे २0१७ पर्यंत टोकन घेतलेल्या शेतकर्‍यांची तूर मोजून घेण्यास राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंंत मुदतवाढ दिली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कें द्रांवर बाजार समिती हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर मोजणी सुरूही झाली आहे; परंतु ही तूर साठविण्यासाठी वखार महामंडळांच्या गोदामात पुरेशी जागाच नसल्याने येत्या दोन दिवसांतच ही खरेदी संकटात येण्याची शक्यता आहे.  राज्य शासनाने तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ३१ मेपर्यंत शासकीय खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी नोंदणी करून टोकन घेतलेल्या शेतकर्‍यांची तूर मोजण्यासाठी २६ जुलैच्या निर्णयानुसार ३१ ऑगस्टपर्यंंत मुदतवाढ दिली. शासनाच्या निर्णयानुसार ही तूर मोजून घेताना अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हास्तरावरच साठवणूक आणि बारदाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना २१ जुलै रोजी या संदर्भातील जाहीर केलेल्या निर्णयाद्वारे दिल्या होत्या. वाशिम जिल्ह्यात ३१ मेपर्यंंत टोकन घेतलेल्या १४ हजार ५४२ शेतकर्‍यांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर मोजणे बाकी होते. त्यामुळे ही तूर खरेदी करण्यापूर्वी वखार महामंडळाच्या गोदामांत साठवणुकीचे नियोजनही आवश्यक होते. जिल्ह्यात मंगरुळपीर, वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथे वखार महामंडळाची गोदामे आहेत. सद्यस्थितीत या गोदामांत शासकीय खरेदी केंद्रांवर मोजलेली तूर साठविण्यात येत असून, बुधवार २ ऑगस्टपर्यंंत १२0३ शेतकर्‍यांची मोजण्यात आलेली २१६२३ क्विंटल तूर साठवून ठेवली असून, आता या गोदामांत केवळ १ हजार २00 मेट्रिक टन शेतमाल साठविण्यापुरतीच जागा उरली आहे. त्यातही रिसोड येथील वखार महामंडळाची गोदामे भरली आहेत. आता पावसाळय़ाच्या दिवसांत मोजलेली तूर साठवावी कोठे, असा प्रश्न उपस्थित झाल्यास तूर खरेदी काही काळ बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे. अशात पाऊस आल्यास बाजार समितीच्या ओट्यांवर ठेवलेल्या तुरीत आद्र्र्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, प्रसंगी तूर वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी धावपळही करावी लागण्याची शक्यता आहे. 

गोदामे उपलब्ध करण्यासाठी विभागीय व्यवस्थापकांकडे प्रस्ताव  वाशिम जिल्ह्यात टोकनधारक शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामांत पुरेशी जागा नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून गोदामे उपलब्ध करण्यासाठी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांसह वरिष्ठ स्तरावर नियोजनाबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार जिल्ह्यात जवळपास अडीच लाख क्विंटल तूर साठविणे शक्य व्हावे, अशी गोदामे उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आता या प्रस्तावानुसार गोदामे भाड्याने घेण्याची किंवा सद्यस्थितीत वखार महामंडळाच्या गोदामांत असलेला शेतमाल इतर ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होण्याची अपेक्षा आहे.

जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रांवर मोजण्यात येत असलेल्या तुरीची साठवणूक करण्यात अडचण येऊ नये म्हणून, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार तूर साठवणुकीसाठी अडीच लाख क्विंटल साठवणूक क्षमतेची गोदामे उपलब्ध करण्याचा प्रस्ताव वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होऊन गोदामे उपलब्ध होतील. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक,  वाशिम

शासकीय खरेदीतील तूर वखार महामंडळाच्या गोदामांत पुरेशी जागा नाही. त्यामुळे शासकीय तूर खरेदी केंद्रांवर मोजलेली तूर साठविण्यासाठी गोदामे भाड्याने घेण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांत वाशिम येथील ८0 हजार क्विंटल क्षमतेचे गोदाम त्यासाठी उपलब्ध होणार आहे.- पी. बी. बांगडे, साठा अधीक्षक वखार महामंडळ वाशिम, मंगरुळपीर