लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण रखडल्यामुळे जून्याच इमारतीत रूग्णांवर उपचार करण्याची वेळ वैद्यकीय अधिकाºयांवर आली आहे. शिरपूर परिसरातील ३० ते ३५ गावच्या नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. सुसज्ज इमारत नसल्याने रूग्णांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. जि.प.सदस्य शबानाबी बागवान, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या पुढाकाराने आरोग्य केंद्राची नवीन इमारत साकारली आहे. या नवीन इमारतीत सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, स्वतंंत्र महिला व पुरूष वार्ड, औषधालय, निर्जंतूकीकरण वार्ड, प्रसुती कक्ष, नेत्र तपासणी कक्ष यासह एकूण ३२ कक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. इमारत बांधकाम तसेच विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर शिरपूर आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा होती. आचारसंहिता संपुष्टात येऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. परंतू, अद्याप लोकार्पण झाले नाही. आरोग्य केंद्राच्या जुनी ईमारती अतिशय लहान असून, येथे भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत. नवीन ईमारतीचे लोकार्पण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
शिरपूर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण रखडले; जून्याच इमारतीत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 5:27 PM