वाशिम : कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर काकाणी यांनी उभारुन दिलेल्या पोलीस मदत केंद्राचा लोकार्पण सोहळा विशेष पोलिस निरीक्षक वाकडे यांच्याहस्ते पार पडला. मन्नालाल काकाणी स्मृती प्रित्यर्थ पोलिस मदत केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात किशोर काकाणी यांनी उभारुन दिलेल्या पोलिस मदत केंद्राच्या इमारतीच्या अनावरणाप्रसंगी किशोर व अश्विनी काकाणी यांनी नवा आदर्श निर्माण केल्यामुळे त्यांचे कौतुक करुन अशा समाजयोगी कार्याची निवांत आवश्यकता असुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे सहकार्य अपेक्षीत आहे असे मत विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी अशा प्रकारच्या उपक्रमामुळे पोलिसासोबतच समाजातील प्रत्येक घटकासाठी नवनवीन उपक्रम राबवुन त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणे अत्यावश्यक ठरते व त्याचा फायदा आम्हा सर्वांना प्राप्त होतो असे आपल्या भाषणात नमुद केले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधिक्षका मोक्षदा पाटील यांचा किशोर काकाणी व अश्विनी काकाणी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.
याच प्रमाणे पोलिस उपअविभागीय अधिकारी कारंजा, मिनाताई भोने व हेल्पलाईनचे जिल्हाध्यक्ष प्रा.अब्दुल अकील यांचा सुध्दा सत्कार करणयात आला. कामरगाव हेल्पलाईनकडुन किशोर काकाणी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा.अब्दुल अकील यांनी तर आभार प्रदर्शन नवले यांनी मानले . यावेळी धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार मानकर , पोलिस उपनिरीक्षक गुहे , रणजीत देशमुख , काळे, सुधाकर मुंदे, रवि भुते, तुमसरे, हिम्मत देशमुख, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हेल्पलाईनचे सर्व सदस्य , आझाद क्रिडा मंडळाचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरिक , पदाधिकारी , गावकरी मंडळीची उपस्थिती लाभली होती.