वाशिम : काेराेना संसर्ग पाहता २०२० मध्ये अनेक कारणावरून महिलांवर अत्याचार करण्यात आले. यामध्ये काेराेनाकाळ २०२० मध्येही ८ महिलांचा खून तर १४ महिलांचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची नाेंद पाेलीस दप्तरी दिसून येत आहे.
२०१९ व २०२० मध्ये एकूण १२ महिलांचा खून करण्यात आला. यापैकी काेराेना काळात ८ जणांचा समावेश आहे. तसेच ३३ महिलांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये काेराेना काळात १४ महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी पाेलीस विभागाच्या वतीने सर्व प्रकरणे दाखल करुन १०० टक्के उघड केली आहेत. पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाेलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये माेठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात २०१९ व २०२० मध्ये झालेल्या स्त्रियांच्या खुनाचा प्रयत्न व स्त्रियांचे खून करणाऱ्यांचा शाेध घेण्यात पाेलिसांना यश प्राप्त झाले आहे. तसेच जिल्ह्यात घडलेल्या विनयभंगाच्या घटना माेठ्या प्रमाणात घडल्या असून यामध्येही सर्व प्रकरणे जवळपास उघड करण्यात आली आहेत.
.....................
ही आहेत खुनाची कारणे
जिल्ह्यात २०१९ व २०२० मध्ये घडलेल्या खुनाच्या घटनांमध्ये काही कारणे अतिशय किरकाेळ असल्याचे दिसून येतात. सर्वाधिक कारणे हे संशय असल्याचे दिसून येतात. काही कारण प्रेम प्रकरणाचे असून यामध्ये राग अनावर झाल्याने काेणी पत्नीचा तर काेणी बहिणीचा खून केला असल्याचे दिसून येत आहे.
............
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न पाेलीस विभागाकडून करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पाेलीस विभागाकडून १०० टक्के प्रकरणे उघड केली आहेत.
वसंत परदेसी , पाेलीस अधीक्षक, वाशिम