संतोष वानखडे / वाशिम : बदलत्या काळानुसार मनुष्य स्वभावाचे ह्यरंगह्ण कसे बदलत आहेत, याचे वास्तव फसवणूक व विश्वासघाताच्या घटनांनी चव्हाट्यावर आणले आहे. गत दोन वर्षांंंच्या तुलनेत चालू वर्षाच्या नऊ महिन्यात फसवणुकीच्या घटनेत दुपटीने वाढ झाली. चालू वर्षाच्या नऊ महिन्यात फसवणूकप्रकरणी तब्बल ७१ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, विश्वासघात करणार्यांचा आकडा नऊ असा आहे. एका चाकोरीत राहून, निसर्गनियमांचे पालन करीत काळ बदलतो; मात्र मनुष्य स्वभावाच्या रंगावर कोणतेच नियम, संकेत, रुढी-परंपरा, नातेसंबंध आवर घालू शकत नसल्याचे फसवणूक व विश्वासघाताच्या प्रकरणांवरून दिसून येते. परस्परातील व्यवहार, घ्यावयाची व सोपविण्याची जबाबदारी, चमकदार सांघिक कामगिरी यांसह इतर महत्त्वपूर्ण व किरकोळ बाबी ह्यविश्वासह्णरूपी पायरी चढल्याशिवाय यशाच्या शिखरापर्यंंंंत पोहोचू शकत नाहीत. एकमेकांवर ठेवलेला ह्यविश्वासह्ण हाच जीवनातील प्रगती व अधोगतीच्या निर्णायक वळणाचा क्षण. प्रत्येकाच्या श्वासातून निघणारा विश्वास ह्यअंध की डोळसह्ण हे समजण्याइतपत मनुष्य अंतज्र्ञानी तर नक्कीच नाही. एखाद्या प्रकरणात बसलेला ह्यदगाह्ण अंधविश्वासू मनुष्याला ह्यदगाबाजह्ण मनुष्याची खरी ओळख करून देतो. तोपर्यंंंत फसवणुकीच्या शस्त्राने ह्यविश्वासह्ण या शब्दावर क्रूरतेने केलेल्या ह्यवारह्णचा काळही निघून गेलेला असतो. गत तीन वर्षांंंंच्या आकडेवारीवर नजर टाकली तर २0१३ मध्ये फसवणुकीच्या ७७ आणि २0१४ मध्ये ५५ घटना घडल्या होत्या. २0१५ च्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात तब्बल ७१ जणांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. २0१३ मध्ये विश्वासघातप्रकरणी चार, २0१४ मध्ये सहा आणि २0१५ मध्ये नऊ घटनांची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगारांची सर्वाधिक फसवणूक झाल्याची नोंद आहे.
फसवणुकीच्या घटनांत वाढ
By admin | Published: October 09, 2015 1:39 AM