कामरगाव: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मास्कची मागणीही वाढली आहे. त्यामुळे कामरगावात ठिकठिकाणी मास्कची दुकानेच थाटण्यात आली असून, ग्राहकांकडून कापडी मास्कची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. काहींनी सामाजिक भान ठेवत अल्पदरात मास्क विकण्यावर भर दिल्याने ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे.
--------------
धनज बु. येथे ११० लोकांची तपासणी
धनज बु.: परिसरात कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने गावागावात कोरोना चाचणी सुरू केली असून, गत चार दिवसात परिसरातील ११० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
-------------
आठवडी बाजार रद्द
धनज बु.: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार भरविण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मंगळवारी धनज बु. येथे भरणारा बाजार रद्द करण्यात आल्याने बाजारात शुकशुकाट होता.
----------
अंबोडा येथे शुकशुकाट
धनज बु.: येथून जवळच असलेल्या अंबोडा येथे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गावातील चौक आता निर्मनुष्य झाल्याने मंगळवारी येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.