यावेळी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उप-जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उप-जिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिंह म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी शहरी भागातील संपूर्ण घनकचऱ्याचे संकलन, विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया गरजेची असून, जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायतींनी त्यादृष्टीने नियोजन करावे, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्कची निर्मिती आदी उपक्रम हाती घ्यावे. शहरांमधील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुल व सर्व खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून ती कार्यरत राहील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.