वाशिम: जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. परतीच्या या पावसामुळे वार्षिक टक्केवारीत किंचित वाढ झाली असून, या पावसामुळे खरीपातील दीर्घकालीन पिकांना आधार मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.
वाशिम जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९८.७० मिमी पाऊस पडतो. तथापि, सप्टेंबरच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात अपेक्षीत पावसाच्या सरासरी ७३ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात हिवाळ्यातच पाणीटंचाई जाणवण्याची भिती निर्माण झाली होती. दरम्यान, खोळंबलेल्या परतीच्या पावसाचे जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरूवातीला जोरदार आगमन झाले. गत तीन दिवसांत बºयापैकी पाऊस पडल्याने पावसाची वार्षिक सरासरी ८१.५८ टक्क्यांवर पोहोचली असून, यामुळे जलसाठ्यात किं चित वाढही झाली आहे. या पावसाचा तूर, कपाशीला फायदा होणार आहेच शिवाय रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या पेरणीसाठीही पोषक वातावरण यामुळे तयार झाले आहे.