मंगरुळपीर (जि. वाशिम) : यावर्षी तालुक्यातील प्रदीर्घ दडी मारल्यानंतर गत दोन दिवस आलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील विविध जलप्रकल्पांच्या जलसाठ्यात थोडी वाढ झाली असून पिकांना नवसंजीवणी मिळाली ांहेच शिवाय दुष्काळाचे संकटही दूर झाल्याने शेतकऱ्यांसह जनसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी सुरुवातीला मृग नक्षत्रात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दिर्घ मारली. जवळपास महीना दीड महिना पावसाने हजेरीच लावली नाही. त्यामुळे शेततील पिके सुकून गेली, तसेच तालुक्यातील बहूतांश जलसाठे पुर्णता कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तालुक्यातीन २१ गावांना पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पातील पाणी साठ्याची पातळी कमालीची घटल्याने मंगरुळपीर शहरासह अनेक गावांत ६ दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. परिणामी पिण्याच्या अभावी जनतेचे हाल सुरु होते. मात्र मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विविध तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या पिकांना संजीवनी मिळाल्याने तालुक्यातील पिके तरारलेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सततधार पावसाने जलसाठ्यात वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या संततधार पावसामुळे विविध प्रकल्पातील जलसाठ्यांत झालेल्या वाढीची माहिती घेतली असता मोतसावंगा प्रकल्प १३.७०, मोहरी प्रकल्प १००, सिंगडोह प्रकल्प ४०.९४, सार्सी प्रकल्प ५.७६, प्रिंपी खुर्द प्रकल्प २१.७८, कोळंबी प्रकल्प २५.२७, सावरगाव प्रकल्प २६.५०, रोहणा प्रकल्प, ३५.९३, दस्तापूर प्रकल्प, ३८.००, कासोळा प्रकल्प ७४.२६, जोगलदरी प्रकल्प ७६.५५ आणि चांधई प्रकल्प ९.४६ याप्रमाणे वाढ झाल्शयाचे निष्पन्न झाले. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला असला तरी, जलसाठे भरण्यास मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असून, पावसाळा जेमतेम महिनाभराचा उरला असताना अशाच प्रकारच्या पावसाची आणखी आवश्यक ता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मंगरुळपीर तालुक्यात जलसाठ्यात वाढ
By admin | Published: August 07, 2015 1:18 AM