वाशिम : यंदाचे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू झाले असले तरी कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशनवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाचा साधारण ५० हजार रुपये खर्च वाढला आहे. त्यात ऑनलाइन शिक्षणाचा फारसा फायदा होत नसून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मंदावत असल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.
'कोव्हिड-१९'च्या प्रकोपामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. एकीकडे त्याला आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे वाटते; तर दुसरीकडे आर्थिक बाबतीत तो हतबल आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी संगणक किंवा स्मार्ट फोन, टॅबलेट अत्यावश्यकच आहे. गोरगरीब पालकांची आर्थिक स्थिती नाही. कसेबसे मोबाईल घेतला तरी दर महिन्याला इंटरनेटचा खर्च करावा लागत आहे. शिवाय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आणि वह्यासुद्धा घ्याव्या लागत असल्याने ऑफलाईन शिक्षणापेक्षा ऑनलाईन शिक्षणाने पालकांचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे.
------
१) जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी
१) पहिली -१९६९०
२) दुसरी -२०९९८
३) तिसरी - १९६९८
४) चौथी - २११७७
५) पाचवी -२१०५२
६) सहावी -२११३६
७) सातवी -२१४३६
८) आठवी -२१५००
९) नववी -२०७००
१०) दहावी - १९७१५
२)महिन्याकाठी इंटरनेटसाठी ३०० रुपये खर्च
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यासाठी मोबाईल किंवा टॅबलेटवर इंटरनेट चालू ठेवावे लागते. महिन्याकाठी पालकांना इंटरनेटवर किमान ३०० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यातही ग्रामीण भागांत इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने त्याचा फायदा होत नसल्याचे दिसते.
------------------
३) दोन मोबाईल अन् इंटरनेटचा खर्च वाढला
१) कोट: कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यात आमच्या दोन्ही मुलांचा ऑनलाईन क्लास एकाच वेळी असतो. त्यामुळे प्रत्येकी ८५०० रुपयांचे दोन स्वतंत्र स्मार्ट फोन घ्यावे लागले असून, दर महिन्याला त्यांच्या मोबाईल रिर्चाजसाठी ४९८ रुपये खर्च करावा लागतो.
-वैशाली गायकवाड, महिला पालक,
---------------------
२) कोट: यंदाही कोरोनामुळे शाळा बंदच असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मला दोन मुले आहेत. त्यांच्या ऑनलाईन क्लासची वेळ वेगवेगळी असली तरी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मोबाईलमधील स्टोरेज स्पेस पुरत नाही. त्यामुळे दोन मोबाईल घ्यावे लागले आहेत.
-दशरथ पवार,
पालक,
---------------------
४) ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे होतेय नुकसान : मानसोपचार तज्ज्ञ
कोट : शाळेतील शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणात बरीच तफावत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे स्नेहसंमेलन, खेळ, सहलींवर निर्बंध आले असून, मुले एकलकोंडी होत आहेत. मानसिक विकासासाठी मोकळे वातावरण असणे अपेक्षित आहे. मोबाईलवर अभ्यास असल्यामुळे मुलांचे मन विचलित होऊ शकते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते.
-डॉ. नरेश इंगळे,
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.