लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत चार महिन्यांपासून शाळेची आॅनलाईन शिकवणी, खासगी आॅनलाईन क्लासेस यासह मोबाईल व संगणकाचा अतिरेकी वापरामुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आजाराबरोबरच कर्णबधिरतेचा धोकाही निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात झाल्यानंतर ते अद्यापपर्यंत शाळेतील प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बंद आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयाच्या शिकवणीदेखील आॅनलाईनपद्धतीनेच घेण्यात येत आहेत.शिक्षण, शिकवणी, गृहपाठ अशा सर्व प्रकारच्या आॅनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी हे अधिकाधिक वेळ संगणक किंवा मोबाईलशी जोडला गेले. गेल्या चार महिन्यांपासून मोबाईल, संगणकाचा वापर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांना डोळयांच्या आजाराबरोबरच कर्णबधिरतेचा धोका, चिडचिड, मान व पाठदुखीचे प्रमाणही पूर्वीच्या तुलनेत आता वाढत असल्याचे दिसून येते.संभाव्य धोका ओळखून पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे ठरत आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाममोबाईल, संगणकावर तासनतास राहणे यामुळे डोळ्याचे विविध आजार उद्भवत आहेत.डोळ्यातील पाण्याचे प्रमाण घटणे, डोळे लालसर होणे, दूरचे कमी दिसणे, प्रारंभी डोळे व नंतर डोकेदुखीचा त्रास होणे, सतत डोळे चोळण्याची समस्या निर्माण होणे, पाठ व मानदुखीचा त्रास होणे.आॅनलाईन क्लासेसमुळे विद्यार्थी हे तासनतास हेडफोनचा वापर करतात. यामुळे कानाला संसर्ग होणे, कमी ऐकू येणे अशा समस्या असलेले विद्यार्थी तपासणीसाठी येतात. कानाच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून हेडफोनचा वापर कमी करणे तसेच कमी आवाज ऐकणे हा पर्याय आहे.- डॉ. संतोष बेदरकर,कान, नाक, घसा तज्ज्ञवाशिम
गेल्या चार महिन्यांपासून आॅनलाईन शिकवणी वर्गामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर वाढला आहे. एकसारखे तासनतास मोबाईल किंवा संगणकावर विद्यार्थी राहत असल्याने डोळ्याशी संबंधित विविध आजार निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, संगणकाचा कमी वापर करणे तसेच एकसारखे मोबाईलवर न पाहणे टाळावे.- डॉ. स्वीटी गोटे,नेत्रतज्ज्ञ, वाशिम