शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

प्रयोगशाळेवरील ताण वाढला ; अहवाल मिळण्यास विलंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:41 AM

वाशिम : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवसाचा विलंब ...

वाशिम : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवसाचा विलंब होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना मोबाईलवर संदेश पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मेडशी ता. मालेगाव आढळला होता. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. गतवर्षी मार्च ते ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यात आरटी- पीसीआर प्रयोगशाळा नसल्याने संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे पाठविण्यात येत होते. त्यानंतर जिल्ह्यातच आरटी-पीसीआर प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध झाल्याने स्वॅब नमुने तपासणी आणि अहवाल मिळण्यासाठीची दिरंगाई दूर झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत होत असून, राज्यातच सर्वत्रच कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही दैनंदिन सरासरी ३५० रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, दैनंदिन दीड हजारांवर चाचण्या होत असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत आहे. त्यातच रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या तालुक्यातील संदिग्धांचे स्वॅब नमुने घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाशिम येथील प्रयोगशाळेला प्राप्त होतात. दोन, तीन दिवसानंतर अहवाल तयार झाला की पुन्हा दुसऱ्या दिवशी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी पाठविला जातो. यामध्ये तीन, चार दिवसाचा कालावधी जात असल्याने आणि या कालावधीत स्वॅब दिलेला संदिग्ध रुग्ण गृह विलगीकरणातच राहील याची कोणतीही शाश्वती नसल्याने त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही दिरंगाई टाळण्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने संबंधित रुग्णाला मोबाईलद्वारे संदेश देण्याची यंत्रणा उभारली जात आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले.

०००००

बॉक्स

अहवालासाठी संदिग्ध रुग्णांची ‘कोविड वारी’

सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनाविषयक लक्षणे दिसून येताच, तातडीने चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार लक्षणे दिसून येताच कोविड केअर सेंटर येथे स्वॅब दिला जातो. साधारणतः दोन किंवा तीन दिवसात अहवाल येईल, असे सांगितले जाते. त्यानुसार अहवाल पाहण्यासाठी संदिग्ध रुग्णांची ‘घर ते कोविड सेंटर’ अशी वारी सुरू होते. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त न झाल्यास दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला संबंधितांकडून संदिग्ध रुग्णाला मिळतो. यादरम्यान संदिग्ध रुग्ण बिनधास्तपणे फिरत असल्याने त्याच्यापासून इतरांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

००००

स्वॅब दिल्यानंतर गृह विलगीकरणातच राहावे !

सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर संबंधितांकडून स्वॅब नमुना दिला जातो. या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधितांनी गृह विलगीकरणातच राहणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकजण बिनधास्तपणे बाहेर फिरतात ; एवढेच नव्हे तर शासकीय, निमशासकीय सेवेतील काही कर्मचारी देखील स्वॅब दिल्यानंतर कार्यालयात जातात. त्यामुळे देखील कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. स्वॅब दिल्यानंतर अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित इतरांच्या संपर्कात न येणे किंवा गृह विलगीकरणातच राहणे अपेक्षित आहे.

००००००

कोट बॉक्स

सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास प्रत्येकाने कोरोना चाचणी करावी. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यास संबंधितांच्या मोबाईलवर संपर्क साधून तसे कळविण्यात येत आहे. स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही पूर्णत्वाकडे आली आहे. स्वॅब दिल्यानंतर इतरांच्या संपर्कात न येता प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

- शण्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी,वाशिम

००००

कोट बॉक्स

कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी अहवाल दिला जातो. कोविड केअर सेंटरमधील संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वॅब घेतलेल्यांना अहवाल तातडीने द्यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. स्वॅब दिलेल्यांनी गृह विलगीकरणात राहून आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.