लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी यांनी केले. भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भूमिपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिला उजाळा देण्यात आला. पुंजाणी म्हणाले की, संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाला समर्पित केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सतत २ वर्ष ११ महिने १८ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन संविधानाची निर्मिती केली. सदर संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले. भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त २६ नोव्हेंबर २०१५ पासून संविधान सन्मान दिवस म्हणून साजरा केला. परंतु आंबेडकरवादी जनता ही दशकापासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करीत आह. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची, विचारधारेची कास धरने अत्यंत आवश्यक असल्याचे पुंजाणी म्हणाले. कार्यक्रमाला कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम. टी. खान, नगरसेवक जुम्मा पप्पुवाले, निसार खान, सय्यद मुजाहिद एजाज शेख, जवेदोद्दीन, चंदन गणराज, अ. रशीद, सलीम गारवे, सलीम प्यारेवले, राजू इंगोले, रशीद निमसुरवाले, जाकिर शेख, भारिप-बमस तालुकाध्यक्ष भारत भगत, देवराव कटके, राजाभाऊ चव्हाण, राजू वानखड़े, देवानंद कांबळे, बबन वानखड़े, समाधान सिरसाठ, अरविंद भगत, संजय प्रगणे, शामराव कांबळे, कौसल्याबाई मोटघरे, अॅड. कुंदन मेश्राम, अॅड. धम्मानंद देवळे, राजेश मस्के, तुळशिराम गुलदे, जि.प. सदस्य मोहन महाराज राठोड, दिलीप सावजी, अर्चना मेश्राम आदिंसह नगर परिषद सदस्य, पदाधिकारी व भारिप-बमसंच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.
भारतीय संविधान मानव समाजाचे सुरक्षा कवच - युसूफ पुंजानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 8:34 PM
भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी यांनी केले.
ठळक मुद्देयुसूफ पुंजानी यांचे प्रतिपादन संविधान सन्मान दिन