..............
निर्बंधातून शिथिलता, ऑटोचालकांना दिलासा
वाशिम : जिल्हा प्रशासनाने १ जूनपासून कडक निर्बंधातून शिथिलता प्रदान केली आहे. यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ सुरू राहत असून, अडचणीत सापडलेल्या ऑटोचालकांनाही दिलासा मिळाला आहे.
.............
रोज मजुरी करणाऱ्यांना कामे झाली उपलब्ध
वाशिम : गत महिन्यांत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे रोज मजुरी करणाऱ्यांच्या हातालाही काम उपलब्ध नव्हते. १ जूनपासून मात्र स्थिती पूर्वपदावर आली असून, कामे उपलब्ध झाली आहेत.
...............
प्रमुख चौकांमधून अवैध वाहतूक
वाशिम : शहरातील पोस्ट ऑफिस चौक, पुसद नाका, रिसोड नाका, अकोला नाका, आदी मुख्य चौकांमधून दैनंदिन अवैध वाहतूक सुरू आहे. वाहनांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून हा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
..............
उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
वाशिम : वाशिम-पुसद रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. असे असताना संथगतीमुळे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.