प्राप्त माहितीनुसार, ११ ऑक्टोबर २०१९ च्या दरानुसार १०:२६:२६ खताची एक बॅग १,१७५ रुपयांना मिळायची. १ मार्च २०२१ च्या दरानुसार सध्या त्याचे दर १,४०० रुपये झाले आहेत. १२:३२:१६ खताच्या बॅगचा दर तेव्हा ११८५ होता, तो आता १४१० झाला आहे. यासह ११ नोव्हेंबर २०२० च्या दरानुसार २०:२०:१३ खताची ५० किलोची बॅग ९२५ रुपयांना मिळायची, ती सध्या ११५० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच डीएपी १८:४६:०० या खताच्या ५० किलो बॅगचा दर १२०० रुपये होता, त्याचेही दर सध्या १५०० झाले आहेत. तथापि, मोठ्या प्रमाणात झालेल्या भाववाढीमुळे शेतक-यांचे खरीप हंगामातील खर्चाच्या तरतुदीचे अर्थचक्र पूर्णत: बिघडणार असून शासनाने बाळगलेल्या या धोरणाप्रती जिल्ह्यातील शेतक-यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
..................
बॉक्स :
इंधन दरवाढीचा परिणाम
गेल्या काही दिवसांत पेट्रोलसह डिझेलच्या प्रतिलीटर दरात विक्रमी वाढ झालेली आहे. यावर्षी खताचे दर वाढण्यामागे हे एक प्रमुख कारण मानले जात आहे.
.....................
खताचे दर
१०:२६:२६ - ११७५ - १४००
१२:३२:१६ - ११८५ - १४१०
१८:४६:०० - १२०० - १५००
.................
डिझेलच्या दरवाढीने मशागतही महागली
नांगरणी, रोटर फिरविणे यासह अन्य स्वरूपातील शेत मशागतीची कामे गेल्या काही वर्षांपासून ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच केली जात आहेत. अशा स्थितीत ट्रॅक्टरला लागणा-या डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, शेत मशागतीचा खर्च वाढला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. असे असताना खताच्या दरातही २५० ते ३०० रुपयांनी वाढ करण्यात आल्याने अडचणीत अधिकच भर पडली आहे.
................
कोट :
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे शेती व्यवसाय पुरता धोक्यात सापडला आहे. शेतमाल विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासनाने शेतक-यांना दिलासा द्यायला हवा; मात्र खताचे दर वाढवून एकप्रकारे अन्याय केला जात आहे.
- विठ्ठल पवार, कोठारी
.............
शासनाने एकीकडे डिझेलच्या दरात विक्रमी वाढ केली. त्यामुळे शेत मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे; तर दुसरीकडे १ मार्च २०२१ पासून खताच्या दरातही २०० ते ३०० रुपयांनी वाढ करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
- रामराव चौधरी, पार्डी टकमोर
..............
कोरोना संकटामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. डिझेलच्या दराने शेतमशागत महागली असून माल विकण्यासाठी शहरात न्यायचा झाल्यास मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. असे असताना खताचे वाढलेले दर संतापजनक बाब आहे.
- श्रीरंग पाटील, गिंभा