काजळेश्वर उपाध्ये (जि. वाशिम) : सोयाबीन पिकावर उंटअळी व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे पीक पाहणीतून समोर येत आहे. कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये येथे कृषी विभागाच्यावतीने क्रॉपसॅप अंतर्गत १0 ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. क्रॉपसॅप अंतर्गत काजळेश्वर येथे किड नियंत्रक अशोक फुके, किड सर्वेक्षक मंगेश सुरजूसे, संतोष हळदे आदिंनी सोयाबीनची पाहणी केला असता, फुलावर आलेल्या सोयाबीन पिकावर उंट अळी आणि लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून आला. या किडीपासून पिकांचे रक्षण करण्यासह उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकर्यांना मार्गदर्शन करताना अशोक फुके यांनी सांगितले की, या किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी १५ मिली किंवा क्लोरोपायरी फॉस २0 ईसी २0 मिली किंवा इन्डासीकार्ब १४.५ एससी १0 मिली किंवा बिव्हिरिया बॅसियाना ४0 ग्रॅम १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच पिकांत प्रती हेक्टर १0 ते १२ कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप)लावावेत, असे अशोक फुके यांनी यावेळी सांगितले. यावेळी डिगांबर उपाध्ये, अशोक उपाध्ये, संतोष उपाध्ये, उमेश उपाध्ये, उत्तमराव उपाध्ये, श्रीराम उपाध्ये, पंकज उपाध्ये, होनवलकर आदिसंह इतर शेतकरी उपस्थित होते.
सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By admin | Published: August 13, 2015 1:12 AM