वाशिम - सोशल मिडियाचा चांगल्याप्रकारे वापर करतो म्हटला तर तो करता येतो. येथील सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाने एक नविन आगळा-चेगळा उपक्रम राबवून माजी विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सोशल मिडियाव्दारे चालविला आहे.वाशिम येथील श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाव्दारे गेल्या दशकापासून सामाजिकतेची जाणीव निर्माण करुन देण्याचे प्रशिक्षण दिल्या जाते. या माध्यमातून शेकडो समाज कार्यकर्ते समाजामध्ये महाविद्यालयाीन प्रशिक्षणाच्या आधारे सेवा देत आहेत. माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील आजी विद्यार्थ्यांसोबत संपर्क राहण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत. महाविद्यालय स्तरावर दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला जातो. यामुळे आजी विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांची प्रेरणा तसेच माजी विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांच्यामध्ये समाजसेवा करण्यासंदर्भात हितगुज घडून येते. तसेच या विद्यार्थ्यांमध्ये रोजगारासंदर्भात , प्रकल्पांसदर्भात, आपतकालीन परिस्थितीत संपर्क व्हावा या दृष्टीेने व्हॉअस अॅप गृपची निर्मिती करण्यात आली. या गृपव्दारे रोजगार संदर्भात असलेली माहिती टाकण्यात येत असल्याने रोजगार शोधण्यात या गृपचा आजी माजी विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होत आहे. या गृपमध्ये महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल नंबरची नोंद करावी व या यामध्ये सहभाग नोंदवावा. ही संकल्पना संस्थाध्यक्ष प्राचार्य एस.एन. कोठारी यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक , कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
‘सोशल मिडिया’व्दारे माजी विद्यार्थ्यांना रोजगाराबाबत माहिती
By admin | Published: April 26, 2017 2:07 PM