-------
अनसिंगला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी
वाशिम: जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील सर्वात मोठी बाजारपेठ, तथा ग्रामपंचायत असलेल्या अनसिंगला तालुक्याचा दर्जा देऊन येथील नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी वाशिम पंचायत समितीचे माजी उपसभापती इम्रान कुरेशी यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
----------------
महामार्गावर पसरतोय चिखल
वाशिम: जिल्ह्यात पूर्णत्वास आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची योग्य देखभाल कंत्राटदार कंपन्यांकडून केली जात नाही. त्यामुळे थोडाही पाऊस आला की महामार्गावर पाण्यासह माती वाहून येते. त्यामुळे चिखल पसरतो. यातून वाहनचालकांना अडचणी येत असून, अपघाताची भीती वाढली आहे.
--------------
सततच्या पावसामुळे शेतात साचले पाणी
वाशिम: गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले असून, या पाण्यामुळे पिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
----------
मुख्य चौकातील खड्ड्यांमुळे अपघाताची भीती
वाशिम: हिंगोली, पुसद, अमरावती आणि अकोलाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शहरातील पुसद नाका परिसरातील मुख्य चौकाच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणी येत असल्याने एखादवेळी नियंत्रण सुटल्यास येथे मोठा अपघात घडण्याची भीती आहे.