वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी केल्यानंतर जिल्ह्यातील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रही बंद ठेवण्यात आले. तथापि, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिवनावश्यक वस्तूच्या खरेदीनुसार हे केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल रोजी दिले; परंतु अद्यापही हे खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले, तर जिल्हाधिकाºयांनी जिल्हाभरात जमावबंदीचे आदेशही लागू केले. याच आदेशातंर्गत जिल्ह्यातील बाजार समित्या आणि शासकीय शेतमाल खरेदी केंद्रही बंद ठेवण्यात आले; परंतु पणंन संचालकांच्या २६ मार्च रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांनी जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा करून ही खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकºयांना दिलासा मिळू शकणार होता; परंतु १० दिवस उलटले तरी जिल्ह्यातील शासकीय शेतमाल खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
शासकीय शेतमाल खरेदी केंद्राच्या सुरुवातीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:42 AM