शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वाशिम बाजार समितीमध्ये हळदीची आवक सुरू; भाव साडे सात हजारावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 7:40 PM

वाशिम : यंदाच्या हंगामातील हळदीची आवक बाजारात सुरू झाली असून, गतवर्षीपेक्षा यंदा या शेतमालास चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सद्यस्थितीत हदीला जास्तीतजास्त ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत.

ठळक मुद्देहळदीची काढणी सुरू; तुर्तास आवक कमीअत्यल्प पावसामुळे यंदा जिल्ह्यातील हळदीचे क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या हंगामातील हळदीची आवक बाजारात सुरू झाली असून, गतवर्षीपेक्षा यंदा या शेतमालास चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सद्यस्थितीत हदीला जास्तीतजास्त ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. तथापि, बाजारात फारशी आवक होत नसून, शनिवारी वाशिम येथील बाजारात केवळ १५ क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. वाशिम जिल्ह्यात गतकाही वर्षांपासून हळदीच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. मसालावर्गीय या पिकाकडे दिवसेंदिवस जिल्ह्यातील शेतक-यांचा कल वाढत असून, यंदाच्या हंगामात जिल्ह्यात जवळपास हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा यंदा मात्र अल्पपावसामुळे हळदीचे क्षेत्र घटले आहे. आता काही ठिकाणी हळदीची काढणी सुरू झाली असून, शेतक-यांनी बाजारात हळदीची विक्री सुरू केली आहे. वाशिम येथील बाजारात हळद खरेदीला सुरुवातही करण्यात आली असून, या ठिकाणी जिल्ह्यातील विविध ठिकाणचे शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. अद्याप ७५ टक्के क्षेत्रातील हळदीची काढणी शिल्लक आहे. जवळपास महिनाभरात हळदीची काढणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिनाभरानंतर हळदीची आवक वाढणार आहे. 

टॅग्स :Market committee washimबाजार समिती वाशिम