मालेगाव : तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या उमरवाडी येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती. ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्यासाठी जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत नव्या विहिरीसाठी निधी मंजूर करून घेतला. आता या योजनेचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे.
उमरवाडी येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी गावात असलेली जुनी विहिर उन्हाळ्याच्या दिवसांत आटते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेत जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत आणि नवीन पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी ४० लाख रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. आता या योजनेचे कामही सुरू झाले आहे. या अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी नवी विहिर, मोटारंपपासाठी कक्ष, तसेचइतर कामे वेगाने करण्यात येत आहेत. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, विहिरीला भरपूर पाणी लागले आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येपासून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून, असलेली ही समस्या निकाली लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.