वाशिम : युवकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व काही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने "युवक आदान-प्रदान शिबिरा"चा उपक्रम राबविण्यात येणार आहे.युवकांमध्ये असलेले सुप्त गुणांना वाव मिळावा , त्यांचे कलागुणाव्दारे इतरांनाही बोध होवून क्रीडा, कला, आरोग्य, सामाजिक कार्यात मदतीकरीता सहभागी व्हावे अशा विविध बाबींचे युवकांमध्ये आदान होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोबतच युवकांचे जिवनमान विकसीत होण्यासकरीता मदत व्हावी या हेतुने क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम, समाज सुधारक संशोधन प्रशिक्षण संस्था ईलखी ता. जि. वाशिमच्या वतिने पंधरा दिवस हे शिबीर राबविण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन वाशिम तालुक्यातील फाळेगाव थेट येथे २७ एप्रिलपासून सुरु झाले आहे. युवकांचे विचारांचे आदान प्रदान होवून खंबीर व नेतृत्वशिल युवक घडावा या करिता वैचारिक चर्चासत्राव्दारे आजच्या बदलत्या परिस्थितीवर मात करण्याकरीता व समाजकल्याणविषयक विषय शिबिरात घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे तज्ञ मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. युवकांसाठी ही एक पर्वणीच असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहनही आयोजकांच्यावतिने केल्या जात आहे.
युवकांसाठी अभिनव उपक्रम
By admin | Published: April 27, 2017 6:46 PM