लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग जोडण्यात आले आहेत. ही प्रक्रिया नियमानुसार पार पडली की नाही, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) ५ डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे दिले असून, याचा अहवाल येत्या १२ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची सुचनाही केली आहे.अमरावती विभागातील जिल्हा परिषद शाळांना अंतराची कुठलीही अट न पाळता सरसकट इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात आल्यामुळे खाजगी शाळांवरील शिक्षक बांधवांच्या सेवांवर आरिष्टय आले असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्ग ५ व ८ मध्ये केवळ ५-७ विद्यार्थी असतानाही तसेच गणित व शिक्षक तसेच प्रयोगशाळा व्यवस्था नसतानाही वर्ग सुरु आहेत. परिणामी गरीब व बहुजन विद्यार्थ्यावर त्याच्या शैक्षणीक गुणवत्तेवर परिणाम होत आहे, अशी तक्रार शिक्षक संघाच्या अमरावती विभागाचे संस्थापक शेखर भोयर यांनी १९ सप्टेंबर आणि ११ आॅक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करतानाच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेत विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या सीईओंना या संदर्भात पत्र पाठवून या प्रकारची चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ७ दिवसांत अर्थात १२ डिसेंबरपर्यंत विभागीय आयुक्तालयाकडे सादर करण्याची सुचनाही केली आहे. विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सुचना केल्या आहेत. तथापि, वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्याची प्रक्रियाच पार पाडण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचा प्रश्नच आमच्यासाठी उद्भवत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.-गजाननराव डाबेरावप्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम
पाचवी व आठवी वर्ग जोडल्याच्या प्रक्रियेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 3:14 PM