दादाराव गायकवाड वाशिम, दि. २१-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या महत्वाकांक्षी ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळेच या कार्यक्रमांतर्गत सन २0१५-१७ च्या निर्धारित उद्दिष्टातील सिंचन विहिरी वगळता निम्म्याहून अधिक कामांना अद्याप जिल्ह्यात सुरवातही झालेली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ११ कलमी कार्यक्रमातून प्रामुख्याने सिंचन विहिर, शेततळे, कंपोस्टिंग, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, गावतलाव व जलसंधारणाची कामे, रोपवाटिका, वृक्षलागवड व संगोपन, क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरणासह अन्य कामाचा समावेश आहे. त्याशिवास पंचायत समिती, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वणीकरण विभागाच्या रोपनिर्मिती आणि वृक्षलागवडीच्या कामांची स्थितीही दयनीय आहे. यात कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात ५४८ शेततळय़ांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यातील केवळ ३ शेततळय़ांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. अद्याप एकही काम पूर्ण झाले नाही. व्हर्मी कंपोस्टचे उद्दिष्ट ५४८ असताना त्यापैकी ३६ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. नाडेप कंपोस्ट टँकचे निर्धारित उद्दिष्ट ४७५ असताना केवळ ९५ कामांना तांत्रिक, तर ५५ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ४0 कामांना सुरूवात करण्यात आली. फळबाग लागवड कार्यक्रमाचे निर्धारित उद्दिष्ट ७५0 हेक्टर असताना २३३ कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय कामांना मान्यता मिळाल्यानंतर त्यातील केवळ ७१ कामे सुरू करण्यात आली; मात्र अद्याप एकही पूर्ण होऊ शकले नाही. प्रत्यक्षात रोहयोची कामे झाल्यास ग्रामीण कामगारांना रोजगार मिळू शकतो. त्यातच कृषी विभागाकडील शेततळे, कपोस्टिंग टँक आणि फळबाग लागवडीची कामे केल्यास शेतकर्यांचा विकास होऊन शेतमजुरांच्या हाताला वर्षभर काम असेल आणि कंपोस्ट खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षणाचा उद्देशही साध्य होऊ शकतो; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शासनाच्या उदात्त हेतुला हरताळ फासला जात आहे. २३00 कामांपैकी एकही काम पूर्ण नाहीजिलत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाला शेततळे, कंपोस्ट टँक, फळबाग लागवडीसह एकूण २ हजार ३२१ कामांचे उद्दिष्ट २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी देण्यात आले होते. तथापि, हे आर्थिक वर्ष संपत आले असले तरी, यातील केवळ ११७ कामे सुरू करण्यात आली असून, गत ९ महिन्यांत एकही काम पूर्ण करता आले नाही.
रोहयोच्या कामांची स्थिती निश्चितच वाईट आहे. कित्येक कामांना अद्याप सुरुवात झाली नाही, हे वास्तव आहे. संबंधित विभागाच्या प्रशासनाने गंभीरपणे काम न केल्यानेच १0 महिन्यांत काही विभागाचे एकही काम पूर्ण झाले नाही. आम्ही सध्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने याबाबत तात्काळ मार्गदर्शन शक्य नाही; परंतू निवडणूक संपताच पूर्वी पेक्षाही अधिक तत्परतेने कामांचा आढावा घेऊन, ही कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देऊ. -सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी (रोहयो)वाशिम