काजळेश्वर उपाध्ये(जि. वाशिम), दि. १७- कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथे १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय तपासणी पथक दाखल झाले. त्यांनी तपासणीमध्ये गावचे रस्ते, जि.प. प्राथ. शाळा, जि.प. उर्दू शाळा, आयुर्वेदिक दवाखाना यांना भेटी दिल्या. ग्रामपंचायत भवन, पशुवैद्यकीय दवाखाना बांधकामाची तपासणी पथकाने पाहणी केली निर्मलगाव योजनेंतर्गत माहिती पथकाने घेतली.ग्रामपंचायत भवन काजळेश्वर येथे प्रथम ग्रामपंचायततर्फे एका छोटेखानी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य ज्योती गणेशपुरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून तपासणी पथकात आलेले जि.प.अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपमुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मिशन कक्ष महेश पाटील, गटविकास अधीकारी डी.बी. पवार, विस्तार अधिकारी साई चव्हाण, गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेहकरकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपकार्यकारी अभियंता राठोड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पाणी व स्वच्छता कक्ष सरतापे, उपसरपंच अ. अलीम अनिस, अनवर, मुख्याधापक उर्दू शाळा दत्ता भड, मुख्याधापक जि.प. मराठी शाळा डॉ. विजय बल्लाड, आर. आर. मुळे, ग्रामपंचायत सदस्य गण इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते. पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता गावातील आठ तरुण प्रशिक्षित होऊन आल्यानंतर त्यांनी सुचविल्याप्रमाणे गावात शोषखड्डे करण्याचे काम ग्रामपंचायतने हाती घेतले असून गाव पाणीदार करण्याच्या दृष्टीने पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्पांतर्गत कामाला ग्रामपंचायत सहकार्य करेल, अशी माहिती ज्योती गणेशपुरे यांनी दिली.
गावाची पथकाकडून तपासणी
By admin | Published: March 18, 2017 3:04 AM