खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकºयांची गैरसोय तसेच फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे. बियाणे खरेदी केल्यानंतर यासंदभार्तील रिलिज आॅर्डर, खरेदी बिल अशी कागदपत्रे असल्याशिवाय बियाण्यांची विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. रिलिज आॅर्डर बंधनकारक असून, कृषी सेवा केंद्रांनी याचे पालन करावे तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बिलावर शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, गाव, पीकाचे नाव व वाण, पूर्ण लॉट नंबर, दर व शेतकऱ्यांची स्वाक्षरी या सर्व बाबी नमूद असणे अनिवार्य आहे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा खरेदी केलेले बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशकाचा सर्व तपशील बिलावर असल्याची व त्याप्रमाणे प्रत्यक्ष निविष्ठा असल्याची खात्री करावी असे आवाहन कृषी विभागाने केले.
कृषी सेवा केंद्रांची तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:41 AM