लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला भेटी देऊन खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.वाशिम तालुक्यातील वाळकी, दोडकी, गिव्हा, वाई, वारला येथे शेतामध्ये जाउन पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. काही नदी, ओढे, नाल्यांना पुर येवून नदीनाल्या काठच्या श्ोतजमिनी खरडून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके वाहून गेली. काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. खासदार गवळी यांनी पिकांची पाहणी करीत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जातील तसेच शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. शेतजमीनी खरडून गेल्यामुळे पुन्हा जमिनीची मशागत करून पेरणी करावी लागणार असल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. महसूल विभागाने खरडून गेलेल्या जमिनीचे व नुकसानग्रस्त शेतकºयांच्या जमिनीचे जलदगतीने सर्व्हेक्षण करावे, शासनाकडून आर्थीक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार गवळी यांनी दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव देशमुख, सुरेश मापारी, शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते पाटील, गजानन देशमुख, वाशिम शिवसेना शहर प्रमुख गजानन भांदुर्गे , निलेश पेंढारकर, गजानन भुरभुरे, विजय खानझोडे, दिपक इढोळे, बंडू पोले, संतोष काळबांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार भावना गवळी यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 4:51 PM
वाशिम - पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला भेटी देऊन खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
ठळक मुद्देखासदार गवळी यांनी पिकांची पाहणी करीत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. शेतजमीनी खरडून गेल्यामुळे पुन्हा जमिनीची मशागत करून पेरणी करावी लागणार असल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार गवळी यांनी दिले.