लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात येत असून याबाबतचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हास्तरीय अधिकाºयांची बैठक झाली. नुकसानग्रस्त प्रत्येक पिकांचे पंचनामे होतील, याची दक्षता घ्यावी. तसेच पंचनामे अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात परतीच्या पावसाने सोयाबीन पिकासह कापूस, फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. या त्याचे पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचमाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यादृष्टीने तालुकास्तरीय यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे अधिक गतीने करावे, तसेच सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरीय अधिकाºयांनी स्वत: काहीठिकाणी भेटी देवून पंचनामे गुणवत्तापूर्ण होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना या बैठकीत वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्या.
पीक नुकसानाचे पंचनामे ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 3:29 PM