वाशिम : गतवर्षी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहिर केलेल्या जनधन योजनेतंर्गत वाशिम जिल्ह्यात वर्षभरात ५४ हजार ७२२ खाती उघडण्यात आली असून सहा महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३२ हजार २३५ नागरिकांना दोन लाख रुपयापर्यंच्या विम्याचे वयाच्या ७0 पर्यंत कवच मिळाले आहे. संपूर्ण वित्तीय समावेशनाच्या दिशेने गेल्या वर्षी जनधन योजनेची घोषणा करून केंद्र सरकारने पाश्चिमात्य देशांप्रमाणे सामाजिक सुरक्षा कोष निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले होते. पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यात अपेक्षीत कामगिरी झाली नसली तरी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना पाच किलोमीटरच्या परिसात बँकिंग सुविधा पुरविण्याच्या दिशेने एक पाऊल टाकल्या गेले आहे े. दुसरीकडे जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेल्या काही खात्यांमध्ये व्यवहार न झाल्याने ही खाती बंद होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी नव्याने खाते उघडून जनधन योजनेतंर्गतचे लाभ देण्याच्या दृष्टीने लीड बँकेचा जिल्ह्यात पाठपुरवा सुरू असल्याचे बँकेचे व्यवस्थपाकांनी स्पष्ट केले. दुसरीकडे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतही जिल्ह्याची प्रगती समाधानकारक आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात ३२ हजार २३५ नागरिकांनाचा नाममात्र १२ रुपये आणि ३३0 रुपये प्रिमियममध्ये दोन लाख रुपयांचा रुपयांचा विमा कव्हर झाला आहे. यामध्ये आपघातात मृत्यू झाल्यास मृतकाच्या नातेवाईकास दोन लाख रुपये मिळणार आहेत. सोबतच आपत्तीमध्ये दोन हात, दोन पाय, दोन्ही डोळे निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. या व्यतिरिक्त जीव ज्योती विमा योजनेत नैसर्गिक मृत्यूसह अन्य कुठल्याही प्रकारे मृत्यू झाल्यास वारसांना विम्याचा लाभ देण्याची तरदूत आहे.
३२ हजार नागरिकाना मिळाले विमा कवच
By admin | Published: August 11, 2015 12:38 AM