- शिखरचंद बागरेचा वाशिम : आॅल इंडिया पिंगलवाडा चॅरीटेबल सोसायटीच्या माध्यमाने विविध जाती धर्मातील अनाथ लावारीस दिव्यांग, तसेच अनेक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निस्वार्थ सेवा देण्यासाठीच आपले जीवन समर्पित आहे असे मत पंजाब राज्यातील अमृतसर येथील आॅल इंडिया पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ.इंद्रजीत कौर यांनी शुक्रवार २३ नोव्हेंबर रोजी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.
आॅल इंडिया पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीची स्थापना कधी झाली?पिंगळवाडा चॅरीटेबल संस्था अमृतसर या संस्थेची स्थापना खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर १८ आॅगस्ट १९४७ पासुन झाली. खालसा कॉलेज अमृतसरच्या कॅम्पमध्ये पोहोचुन दिनदुबळ्याची सेवा करण्याच्या कार्याला संस्थेचे संस्थापक भगतपुरण सिंह यांनी सुुरुवात केली.
आपल्या चॅरीटेबल सोसायटीच्या माध्यमाने नेमके कोणते कार्य केले जातात.?आमच्या चॅरीटेबल सोसायटीच्यावतिने धर्म जाती, वर्ग व रंगभेद न करता लाचार ,अपंग, रुग्ण, मानसीक रोगी, असलेल्या महिला पुरुष, मुले, व वृध्दांसह असाध्य रोेंगीची निस्वार्थ निशुल्क सेवा केली जाते.आपणास या कार्याची प्रेरणा कशी मिळाली.?पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीचे संस्थापक भगतपुरण सिंह यांची दिनदुबळ्या प्रतीची तळमळ व निस्वार्थ सेवा बघुन या कार्याची प्रेरणा आपणास मिळाली. पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीचे अध्यक्षपद आपणास कधी मिळाले.?सन १९७७ पासुन आपण पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीमध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. सन १९८७ मध्ये आपणास रितसर सदस्य म्हणुन स्थान मिळाले. त्यानंतर सन १९८८ मध्ये उपाध्यक्षपदी निवड झाली. आपली सेवा भावना व समर्पन बघुन संस्थापक भगतपुरण सिंह यांनी सन १९९२ मध्ये अध्यक्षपदी आपली निवड करुन संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपविली.आपणास पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला.? भारत सरकारने जानेवारी २००८ मध्ये पद्मभुषण पुरस्कारासाठी आपली निवड करुन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते आपणास सन्मानीत केल्या गेले.