शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

रोहयोच्या कामात अनियमितता; ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 7:09 PM

वाशिम : मालेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित तर चार कंत्राटी कर्मचाºयांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी २ आॅगस्ट रोजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित तर चार कंत्राटी कर्मचाºयांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी २ आॅगस्ट रोजी केली. मालेगावचे तत्कालिन गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.मालेगाव पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी रवि सोनोने, मिनी बीडीओ तथा विस्तार अधिकारी (पंचायत) पुंडलिक भालचंद्र राठोड, सहायक लेखाधिकारी एस. एम. इंगळे आणि ब्राहमणवाडा येथील ग्रामसेवक निलेश ढंगारे असे निलंबित कर्मचाºयांची नावे आहेत. कंत्राटी सेवेवर कार्यरत पॅनल तांत्रिक अधिकारी पवन उमेश भुते, सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश्वर श्रीकीसन ताकतोडे,  संगणक आॅपरेटर सागर गजानन इंगोले, ब्राहमणवाडा येथील ग्रामरोजगार सेवक शत्रुघ्न खिल्लारे असे कार्यमुक्त केलेल्या कर्मचाºयांची नावे आहेत. मालेगाव तालुक्यातील ब्राहमणवाडा येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, नाला सरळीकरण, विहिर आणि शौचालय ईत्यादी कामाच्या चौकशी दरम्यान अनेकजण दोषी आढळून आले आहेत. या योजनेंतर्गतची कामे असमाधानकारक असणे, कामात अनियमितता असा ठपका ठेवून निलंबन व कार्यमुक्तीची कारवाई करण्यात आली. मालेगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सहायक प्रशासन अधिकारी रवि सोनोने यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पुर्ण न करणे, कर्तव्यात कसुर करणे, तक्रारीच्या अनुषंगाने वेगवेगळी माहिती सांगणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. विस्तार अधिकारी पुंडलीक राठोड यांच्यावर कर्तव्यात कसुर करणे, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी ब्राहमणवाडा येथील ग्रामसेवक निलेश ढंगारे यांच्यावर ब्राहमणवाडा येथील नाला सरळीकरण, शेततळे व वृक्ष लागवड कामांतर्गत ग्रामपंचायतकडुन कामाची मजुरांकडुन मागणी नसतांना परस्पर मस्टर काढणे, नाला सरळीकरणाची आराखडयापेक्षा जास्त कामे सुरु करुन शासकीय निधीचा अपव्यय करणे, वृक्ष लागवडीच्या कामात अनियमितता करुन निधीचा अपव्यय करणे, अल्पवयीन लाभार्थ्यांना जॉबकार्ड देणे आणि कर्तव्यात कसुर करुन कामात हलगर्जीपणा करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच रोहयो विभागात करार तत्वावर कार्यरत पॅनल तांत्रिक अधिकारी पवन उमेश भुते, योगेश्वर श्रीकीसन ताकतोडे,  आॅपरेटर सागर गजानन इंगोले यांच्यासह ब्राहमणवाडा येथील ग्राम रोजगार सेवक शत्रुघ्न खिल्लारे यांना कंत्राटी सेवेतुन कार्यमुक्त करण्यात आले. मालेगावचे तत्कालीन गट विकास अधिकारी संदिप कोटकर यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रचंड अनियमितता झाली असुन त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले आहे. या विभागाशी संबंधित मालेगाव तालुक्यातील इतरही गावातील कामांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम