गत आठ दिवसांपूर्वी मालेगाव रस्त्यावरील ‘नूर ट्रान्सफार्मर’ म्हणून ओळख असलेल्या रोहित्र वीज वाहिनी असलेला खांब जमीनदोस्त झाल्याने नादुरुस्त झाले. त्यानंतर स्थानिक शेतक-यांनी वेळोवेळी शिरपूर येथील विद्युत वितरणच्या कार्यालयाकडे रोहित्र दुरुस्त करून मिळण्याची मागणी केली. तसेच वाशिम येथील कार्यालयालाही याबाबत अवगत करण्यात आले. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशावरून जमीनदोस्त झालेला खांब उभारण्याचे काम तत्काळ करण्यात आले; मात्र नादुरुस्त झालेले रोहित्र तसेच पडून आहे. परिणामी, गहू, संत्रा व इतर पिकांना सिंचन करण्यासाठी शेतक-यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय गुरांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने रोहित्राची विनाविलंब दुरुस्ती करून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अनंत देशमुख, रवी जाधव या शेतक-यांनी केली.
नादुरुस्त रोहित्रामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:35 AM