लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यशासनाचा कृषी विभाग फळबागांचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने ज्या भागांत रोहयो अंतर्गतच्या विहिरी आणि मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्या भागांतील लाभार्थींना फळबाग लागवडीस प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन संचालकांनी तालुकानिहाय प्रकल्प सादर करण्याच्या सुचना सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना २० आॅगस्ट रोजी पत्र पाठवून दिल्या आहेत.राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली २२ आॅगस्ट रोजी राज्यातील फळबाग लागवडीच्या आढावा घेण्याबाबत सभा पार पडली. ज्या भागांत रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. त्या शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश त्या सभेत देण्यात आले. यासाठी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी फळबाग लागवडीसाठी तालुकानिहाय प्रकल्प सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादक संचालकांनी २० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत. ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत होणार लागवडराज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मागेल त्याला शेततळे अंतर्गत शेततळे पूर्ण करणाºया, तसेच रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी पूर्ण करणाºया शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केल्यानंतर त्यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असून, प्रस्ताव देणाºया शेतकºयाच्या शेतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कृषी विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे.
सिंचन विहिरी, शेततळे धारकांच्या शेतीत होणार फळबाग लागवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 5:29 PM