कारंजा लाड, दि. १६ - ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा लाडला ९00१:२0१५ आयएसओ मानांकन जाहीर झाले आहे. ही माहिती कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चोरे यांनी सोमवारी दिली. ह्यजाझ एन्झह्ण या आंतरराष्ट्रीय कंपनीचे प्रतिनिधी प्रमोद पाटील व त्यांच्या चमूने पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी के ली. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीत झालेला बदल, गुन्हे अभिलेख, गुन्ह्यात झालेली लक्षणीय घट, पोलीस स्टेशन हद्दीतील गावांना भेटी आदींची तपासणी केल्यानंतर सदर मानांकन दर्जा घेऊन प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, यांचेतर्फे कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चोरे यांचा सत्कार करण्यात आला. आयएसओ मानांकन प्रक्रियेच्या काळात पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नाकर नवले आदींनी यासाठी मार्गदर्शन केल्याचे ठाणेदार अमर चोरे यांनी सांगितले.सदर मानांकनासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला ‘आयएसओ’ मानांकन
By admin | Published: March 17, 2017 2:41 AM