शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उंबर्डा बाजार, चौैसाळ्यात जय मुंगसाजीचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:36 PM

विविध गावावरून येणाºया पालख्यांचे २९ फेब्रुवारी रोजी उंबर्डाबाजार नगरीत आगमन झाले.

चौसाळा/  उंबर्डा बाजार (वाशिम): दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होण्यासाठी जाणाºया सहा विविध गावावरून येणाºया पालख्यांचे २९ फेब्रुवारी रोजी उंबर्डाबाजार नगरीत आगमन झाले. यावेळी जय मुंगसाजी श्री मुंगसाजीच्या गजराने  परिसर दुमदुमला होता. मानोरा तालुक्यातील चौसाळा येथेही या पालख्या दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत व पुजन करण्यात आले.    सोमवार २ मार्च रोजी मुंगसाजी माउलीचा पुण्यतिथी महोत्सव असल्याने पुंडलिक महाराज संस्थान पुंडलिकनगर मुर्तिजापूर, लहरीबाबा संस्थान मधापुरी, मुंगसाजी महाराज संस्थान लोहोगांव (वाढोणा), मुंगसाजी महाराज संस्थान तिघारा, मुंगसाजी महाराज संस्थान मेहा, मुंगसाजी महाराज संस्थान अंबाडा येथील मुंगसाजी माऊलीच्या पालख्या २९ फेब्रुवारीला उंबर्डाबाजार नगरीत मुक्कामी दाखल झाल्या होत्या. गावात पालखी सोहळा दाखल होताच गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची शोभा यात्रा काढण्यात आली . यावेळी ‘जय मुंगसाजी श्री मुंगसाजी’च्या गजरा ने परिसर दुमदुमून गेला होता. यातील विविध पालख्यांतील वारकºयांसाठी भोजन तथा निवासाची व्यवस्था किशोर पाटील मिरासे, नंदुबाप्पु देशमुख, डॉ. न. म. चौधरी,  साहेबराव सोमनाथे, राहुल राजेंद्र पचगाडे (अमरावती) मुन्नाभाऊ ठाकूर यांनी केली. तसेच १ मार्च श्रीक्षेत्र रापेरी येथे सर्व पालखी मंडळातील वारकरी मंडळींची भोजनाची व्यवस्था उंबर्डाबाजार येथील रवि महाराज  श्रीराव यांचे वतीने करण्यात आली होती.  

चार हजार वारकºयांचे चौसाळ्यात आगमनचौसाळा: मुंगसाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मानोरा तालुक्यातील चौसाळा येथे १ मार्च रोजी १७ गावातील पालख्या दाखल झाल्या होत्या. या सर्व पालख्यात मिळून जवळपास चार हजार वारकºयांचा समावेश होता. यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.यवतमाळ जिल्ह्यातीत दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे भगवान मुंगसाजी महाराज यांचे समाधी स्थळ आहे. दरवर्षी मुंगसाजी माऊलीचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून हजारो वारकरी पायदळ दिंडीने मुंगसाजी माउलीच्या दर्शनासाठी येतात. चौसाळा मार्गे जाणाºया या दिंड्यातील सर्व वारकºयांसाठी गावातील प्रत्येक ग्रामस्थ अन्न दानाचा कार्यकम आयोजित करतो. यंदाही गावात १७ पालख्यांचे आगमन होताच येथील ग्रामस्थांनी माऊलीच्या पालख्यांचे आनंदात स्वागत केले व गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालख्यांचे जेवन आटोपल्यानंतर संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास धामनगाव देवकडे प्रस्थान झाले

टॅग्स :washimवाशिम