संतोष वानखडे
वाशिम: श्री सम्मेद शिखरजी या जैन समुदायाच्या तीर्थक्षेत्राला झारखंड सरकारने दिलेल्या पर्यटन स्थळाच्या दर्जाला विराेध तसेच शिखरजी तीर्थक्षेत्राला पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून घोषीत करावे या मागणीसाठी कारंजातील सकल जैन बांधवांनी ११ जानेवारीला कारंजा भव्य मुकमोर्चा काढला.
स्थानिक गांधी चैाकातील जैन मंदीर तथा अहिंसा भवन येथून मुकमोर्चाला प्रारंभ झाला. याप्रसंगी सर्वप्रथम १०८ वेळा नमोकार मंत्राचा जप करण्यात आला. यानंतर श्वेतांबरी साध्वी संयम गुणाजी महाराज, साध्वी चैत्य गुणाजी महाराज, साध्वी मल्ली गुणाजी महाराज यांनी जैन समाज बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आमदार राजेंद्र पाटणी, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मूकमोर्चास प्रारंभ होउन गांधी चैाक, जैन मंदीरापासून, महाविर चैाक, महात्मा फुले चैाक, दिल्ली वेश, शिवाजी महाराज पुतळा, जयस्तंभ चैाक यामार्गे मार्गस्थ होउन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
उपविभागीय अधिकारी धिरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सकल जैन बांधवाचे प्रतिनिधी यांच्यासह महीला, पुरूष, लहान मुलांची रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्री. श्वेतांबर जैन समाज संघटना, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सकल जैन समाज समितीमधील समाज बांधवांची उपस्थिती हेाती.
यावेळी जैन बघेळवाळ महीला मैत्री मंडळ, महाराष्ट नवनिर्माण सेना, एम.आय.एम संघटना, व्दारकामाई संगीत महेफिल, ज्ञानसागर विचार मंच, विश्व हिंदु परीषद, यमुनाबाई सैतवाळ जैन संघ, तरून क्रांती मंच, माहेश्वरी समाज संघटना, सर्वधर्म आपत्कालीन संस्था, श्री गुरूदेव सेवाश्रम समिती आदी विविध सामाजिक संघटनानी पाठींबा देत त्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थिती हेाते. या मोर्चादरम्यान सुंदलाल सावजी बॅकेकडून शरबतची व्यवस्था करण्यात आली होती. या रॅलीमध्ये तिन हजार पेक्षा जास्त जैन बांधंवाचा सहभाग होता. मोर्चा दरम्यान सकल जैन बांधवांकडून आपआपली प्रतिष्ठाने सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. अॅड संदेश जिंतुरकर, धनंजय राऊळ, सतिश भेलांडे, निनाद बनौरे, विजय सेठ लोढाया, के. एम. गटागट, शिरीष चवरे, शांतीलाल बरडीया, प्रज्वल गुलालकरी, नितीन बुरसे, हितेश रूईवाले, समीर जोहरापुर यांनी उत्कृष्ट आयोजन केले होते. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र खडारे, विवेक गहानकरी यांनी केले.
१०८ फुटाचा ध्वज
श्री सम्मेद शिखरजी या जैन समुदायाच्या तीर्थक्षेत्राला वित्र तिर्थक्षेत्र म्हणुन घोषीत करावे, या मागणीसाठी कारंजात आयोजीत रॅलीमध्ये सकल जैन समाजातील युवकांनी १०८ फुटाचा ध्वज हातात घेउन रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. कंकुबाई श्राविका आश्रमच्या मुली, महाविर ब्रम्हचारी आश्रमच्या विद्यार्थी यांच्यासह शाळेकरी मुले, मुली वेशभुषा परीधान करून रॅलीत सहभाग होते.