लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुस्लिमांना शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळण्याच्या मुख्य मागणीसह अन्य स्वरूपातील विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘जमियत उलमा ए हिंद’ या संघटनेच्या वतीने वाशिम जिल्ह्यात शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने १९ जुलै २०१४ च्या निर्णयान्वये शासकीय, निमशासकीय सेवेत तथा शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते; परंतु विधिमंडळाने सदर आरक्षण प्रस्ताव ६ महिन्यात मंजूर केला नाही. या धोरणाविरूद्ध १८ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या बैठकीत राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आज जिल्हाभरात मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले.
वाशिम जिल्ह्यात ‘जमियत उलमा ए हिंद’चे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:20 PM