लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरासह तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी वाशिम शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली. या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सुरुवातीच्या दोन दिवसानंतर १८ सप्टेंबर रोजी तिसºया दिवशीही वाशिमची बाजारपेठ कडकडीत बंद होती. कामानिमित्त घराबाहेर पडणाºयांची गर्दी रस््त्यांवर दिसून येत होती. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असला, तरी काही रस्त्यांवर वर्दळ कायमच असल्याचे दिसून आले.दरम्यान, मालेगाव येथेही जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असून, १८ सप्टेंबरला येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला असून, मृत्यूची संख्या आता पाऊणशेकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंतच कोरोनाबाधितांची संख्या ३२११ रुग्णसंख्या असून, यापैकी ८२५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. सप्टेंबर महिन्यात वाशिम शहरातील कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या घरात पोहोचण्या स्थितीत आली. त्यानंतरही बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाशिम शहरातील व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले. त्यानुसार १६ सप्टेंबरपासून वाशिम शहरात जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. त्यात पहिल्याच दिवसापासून दवाखाने, मेडीकल, दूध संकलन व विक्री आणि काही अपवाद वगळता बाजारपेठ ८० टक्के बंदच होती. जनता कर्फ्यूच्या तिसºया दिवशी मात्र सुरुवातीच्या दोन दिवसांपेक्षाही कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरही महत्त्वाच्या कामासांठी येजा करणारे पादचारी आणि वाहनचालक वगळता रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.
‘जनता कर्फ्यू’ : वाशिम शहरात बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:31 PM