वाशिम : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आजघडीला महिलांचे सशक्त वैचारिक संघटन म्हणून जिजाऊ ब्रिगेडची ओळख असून महिलांमधील आत्मविश्वास उंचावण्याचे काम करतांना व्यक्तीमत्व विकासासाठी जिजाऊ ब्रिगेडचे कार्य असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महासचिव पूनम पारसकर यांनी केले. त्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत ७ डिसेंबर रोजी बोलत होत्या.
वाशिम येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बाजड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा प्रा. सविता मोरे, अकोला जिल्हाध्यक्षा इंदूमती देशमुख उपस्थित होते. यावेळी संवाद बैठका, सभासद नोंदणी, मराठा मार्ग वर्गणीदार बनवणे, ग्रामीण शाखा स्थापना, जिजाऊ सृष्टी योगदान, जिजाऊ जन्मोत्सव, निधी संकलन आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला. सभेचे संचालन वैशाली बुंधे, प्रास्ताविक सविता बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन सुनिता कढणे यांनी पार पडले.
या सभेला मिना मापारी, सुरेखा आरू, प्रा.सुनिता गोरे, कामीनी अवचार, जयश्री बारड, संध्या आव्हाळे, विभा वाझूळकर , वंदना भोयर , विजया दहातोंडे , सुनिता राऊत, कल्पना हागे, मनीषा इंगळे, रुपाली बोदडे, सिमा झामरे,आदींसह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.