यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, महाराष्ट्राचे प्रख्यात कवी गायक प्रबोधनकार मनोजराजा गोसावी, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सु. ना. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने म्हणाले की, नदीला पूर आला की, पुरासोबत पालापाचोळा वाहत येतो. पूर ओसरला की नदीच्या पात्रात जे पाणी शिल्लक राहते ती त्या नदीची खरी क्षमता असते, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीची खरी क्षमता असलेले नेते चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले. यावेळी प्रा. सु. ना. खंडारे, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर कांबळे, जिल्हा सरचिटणीस रवि अंभोरे, वाशिम शहराध्यक्ष मनीष भालेराव, कारंजा शहराध्यक्ष सचिन पाटील, रिसोड तालुका अध्यक्ष संजय बनसोड, वाशिम तालुका युवा अध्यक्ष वैभव खडसे, अरुण नागुलकर, सागर भालेराव, विद्याधर बनसोड, रमेश टाले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय बनसोड, तर आभार प्रदर्शन रवि अंभोरे यांनी मानले.