लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसह खासगी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळा २७ जूनपासूनच सुरू कराव्या, असे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जूनला दिले. मात्र, त्याची पायमल्ली करीत इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यायोगे उच्च न्यायालयाच्या ८ जून २००७ चा निर्णय व २२ जून २००७ च्या शासन आदेशाचीही अवहेलना झाली आहे.
२७ जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्देशाची पायमल्ली
By admin | Published: June 16, 2017 1:47 AM