वाशिम, दि. १३- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, ८ नोव्हेंबरपासून चलनातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा परिणाम इतर क्षेत्रांवर होण्यासोबतच मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहारही पूर्णत: ठप्प झाले आहेत. जिल्हय़ात ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान बोटावर मोजण्याइतपतच व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. दैनंदिन व्यवहारात वापरला जाणारा काळा पैसा कायमचा हद्दपार व्हावा, या मूळ हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनपेक्षितपणे ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द ठरविण्याचा निर्णय मंगळवारी रात्री ८ वाजता जाहीर केला. या निर्णयाचे दुरगामी परिणाम अत्यंत फायदेशीर असले तरी तूर्तास सर्वांनाच अचानकपणे झालेल्या बदलाचा जबर फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. शेतजमीन, बांधलेले पक्के घर, रिकामे प्लॉट यासह इतर स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून जिल्हय़ात दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालत असे. काही महिन्यांपूर्वी थोडीथोडकी रक्कम देऊन ह्यइसारचिठ्ठीह्ण करणार्या अनेकांच्या खरेदीचा व्यवहार नोव्हेंबर २0१६ महिन्यात होऊ घातला होता; मात्र बुधवारपासून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्याने रोखीचा व्यवहार जवळपास अशक्य ठरला आहे. रद्द झालेल्या या नोटा स्वीकारायला कुणी तयार नाही आणि मोठय़ा रकमेचा ह्यविड्रॉलह्ण द्यायला बँका तयार नाहीत, अशा द्विधा संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार अडकले आहेत. आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिममध्ये दिवसाला मालमत्ता खरेदी-विक्रीची साधारणत: १५ प्रकरणे निकाली काढली जात होती. या माध्यमातून सुमारे ८0 लाख ते १ कोटीपर्यंत व्यवहार व्हायचे. ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान मात्र हे प्रमाण दैनंदिन ४ ते ५ प्रकरणांवर येऊन ठेपले असून मालमत्ता विक्री करणार्यांच्या तुलनेत खरेदी करणार्यांचे प्रमाण घटले आहे.
खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!
By admin | Published: November 14, 2016 2:43 AM