वाशिम : उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने वाशिममार्गे ३० मार्चपर्यंत निर्धारित असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही विशेष एक्स्प्रेस आता एप्रिलअखेरपर्यंत धावणार आहे.
यापूर्वी अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरून धावत असलेली गाडी क्रमांक ०७०५३ काचीगुडा-लालगढ १३ ते २७ एप्रिलपर्यंत दर शनिवारी काचीगुडा येथून रात्री ९:३० वाजता सुटेल वाशिम रेल्वे स्थानकावर सकाळी ७ वाजता पोहोचून सोमवारी लालगढ येथे दुपारी १३:३५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७०५४ लालगढ-काचीगुडा दर मंगळवारी प्रस्थान स्थानकावरून रात्री १९:४५ निघेल.
वाशिम येथे दुसऱ्या दिवशी रात्री २२:२८ वाजता पोहोचून काचीगुडा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ९:४० वाजता पोहोचेल. ही रेल्वे १६ ते ३० एप्रिलपर्यंत धावेल. विशेष एक्स्प्रेस कामारेड्डी, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर मार्गे धावेल.