लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील जयपूर येथील ओंकारेश्वर विद्यालयात शिकत असलेल्या कल्याणी गादेकर या कुस्तीपटू विद्यार्थीनीने अमरावती येथे झालेल्या १७ वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले. या स्पर्धेचा समारोप सोमवार, २९ आॅक्टोबर रोजी झाला.अमरावती येथील क्रीडा संकुलावर पार पडलेल्या १७ वर्षे वयोगट आणि ४६ किलो वजनगटातील कुस्ती स्पर्धेत कल्याणी गादेकरने अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करित अंतीम सामन्यात कोल्हापूर विभागाच्या अनुष्का भाट हिला मात देत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाप्रती तीला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. हे यश संपादन करण्यासाठी कल्याणी गादेकरला शांताबाई शिंदे, मुख्याध्यापक संजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, तालुका क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रकांत उप्पलवार, क्रीडा अधिकारी पांडे, कतोलकर, सॉफ्ट टेनिस सचिव कुलदीप बदर, बाळासाहेब गोटे आदिंचे मार्गदर्शन लाभले.
वाशिम जिल्ह्यातील कल्याणी गादेकरला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 4:37 PM