लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): शहरातील व्दारका कॉलनीस्थित दत्ता विश्वनाथ ताथोड यांच्या घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३.२५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना २७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली.दत्ता विश्वनाथ ताथोड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की २७ जानेवारी रोजी ते कुटूंबासह गावी गेलेले होते. २८ जानेवारीला सकाळी ते कारंजातील त्यांच्या निवासस्थानी परत आले असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या स्थितीत आढळले. घरात जावून पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरात ठेवलेले २ मंगळसूत्र, १ गोप, ३ कानातील दागिणे असा एकंदरित १३० ग्रॅम सोन्याचा ऐवज (अंदाजे किंमत ३ लाख २५ हजार रूपये) लंपास झाल्याचे निदर्शनास आले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ४५७, ३५७ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांच्या तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञास घटनास्थळी पाचारण केले होते. सदर घटनेचा पुढील तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी यादव, ठाणेदार एम. एम. बोडखे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पायघन करीत आहेत.
कारंजा : घराचे कुलूप तोडून ३.२५ लाखांचे दागिने लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 7:29 PM
कारंजा लाड (वाशिम): शहरातील व्दारका कॉलनीस्थित दत्ता विश्वनाथ ताथोड यांच्या घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३.२५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना २७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली.
ठळक मुद्देपोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह