लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ फेब्रुवारीला अटक केली. ही घटना कारंजा लाड (जि. वाशिम)येथे घडली. कारंजा लाड येथील तक्रारदाराने घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे त्याला लाईनमन चव्हाण व खासगी लाईनमन शेख रहमत या दोघांनी दंडात्मक कारवाई न करता व्यावसायीक मिटर करून देण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारावर एसीबी पथकातील पोलीस निरिक्षक निवृत्ती बोºहाडे, नितिन टवलारकर, विनोद अवगळे, अरविंद राठोड व इंगळे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी खासगी लाईनमत शेख रहमत याने तक्रारदाराकडून दोन हजार रूपयाचा लाच स्विकारताना अटक केली. लाईनमन चव्हाण याने खासगी लाईनमन मार्फत लाच मागितल्यामुळे चव्हाण यालासुध्दा अटक करण्यात आली. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
कारंजा लाड : विद्युत ग्राहकाकडून लाच स्वीकारणारे दोन लाईनमन एससीबीच्या जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 7:55 PM
वाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ फेब्रुवारीला अटक केली. ही घटना कारंजा लाड (जि. वाशिम)येथे घडली.
ठळक मुद्देघरगुती मिटरचा व्यावसायीक वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई न करता स्वीकारली दोन हजाराची लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दोघांना रंगेहाथ पकडले