साध्या पद्धतीने महाशिवरात्री उत्सव
वाशिम : कारंजा तालुक्यातील इंझा वनश्री येथील संत कैलासनाथ महाराज संस्थानवर दरवर्षी हाेणारा महाशिवरात्री उत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. काेराेना संसर्ग पाहता केवळ मंदिरातील पुजारी यांच्या उपस्थितीत हाे साेहळा पार पडणार आहे.
ताेंडगाव येथे किडीचा प्रादुर्भाव
वाशिम : तालुक्यातील ताेंडगाव येथे भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी कीड नियंत्रणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहे. भाजीपाला पिकांमधील भेंडीवर शेंडे व फळे पाेखरणाऱ्या अळ्या दिसून येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शेलूबाजार बस थांब्यावर घाण
वाशिम : शेलूबाजार येथील बस थांब्यावर काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकून देत असल्याने सर्वत्र घाण पसरलेली दिसून येत आहे. ग्रामपंचायतने लक्ष देऊन या भागाची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नियमाचे उल्लंघन; चालकावर कारवाई
अनसिंग : वाशिम-रिसोड मार्गावरील वांगी फाटा, मोहजा रोड आदी परिसरात वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर बुधवारी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे.
अंगणवाडीतील आधार नोंदणी ठप्प
धनज : अंगणवाडीतील बालकांची आधार नोंदणी कोरोनामुळे ठप्प पडली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आधार नोंदणी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बँकेत ग्राहकांची गर्दी कायम
वाशिम : कोरोना काळातही वाशिम शहरातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी पतसंस्थेत ग्राहकांची गर्दी होत असल्याचे ८ मार्च रोजी दिसून आले. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याकडे अनेक ग्राहकांचे दुर्लक्ष झाले.
इंझोरी येथील तलाठ्याचे पद रिक्त
इंझोरी: येथील तलाठ्याचे पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून, येथील प्रभार इतर तलाठ्यांकडे दिला आहे. यामुळे कामे खाेळंबली आहेत.