कारंजा : उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरड़े यांनी कारंजा तालुक्यामधील इंझा येथे भेट देऊन सत्यमेव जयते ‘वॉटर कप’स्पर्धा ३ मधे श्रमदनातून जलसंधारणाची कामाच्या भूमीपूजनास प्रारंभ करुन स्पर्धेस सुरुवात केली.
गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटविन्याच्या हेतूने गावात शोषखड्डेचे भूमिपूजन करण्यात आले.उपजिल्हाधिकारी यांनी ‘वॉटर कप’ मधे रोहयोची कशी जोड़ देता येईल याविषयी मार्गदर्शन केले. शोषखड्डे, नर्सरी रोपवाटिका, गांव तलाव शेततळे, सी. सी. टी, एल बी एस, कंपोस्ट खत यूनिट, विहिर पुनर्भरण, फळबाग इत्यादी कामे रोहयोअंतर्गत करता येईल. गावात शोषखड़याचा सर्वे करुन ग्रामस्थांची यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी शोषखडा करणाºया व्यक्तिच्या कुटुंब सदस्याचा सत्का केला . फाउंडेशन तालुका समन्वयक श्याम सवाई, रविंद्र लोखंडे, सरपंच संकेत नाखले, ग्राम सेवक अमोल पाटिल, मनीष वारोकार,रोजगार सेवक अमोल जिचकार, पोलीस पाटिल प्रकाश नाखले, माजी सरपंच कमलाकर मोरे,तंटा मुक्ति अध्यक्ष निरंजन बहुते,उप सरपंच किरण भगत, सदस्य उमेश पवार, गणेश बागड़े,शकील गारवे,उषा चतुर, सोनू सोलंकी, प्रमिला राउत,शाळा समिती अध्यक्ष संतोष गटलेवार, संतोष पवार,युवा कार्यकर्ता सुमित भगत, पदमाकर कडू,संतोष भगत,वॉटर हीरो गोरख वनखडे, शब्बीर दरगेवाले इ ची उपस्थिति होती,कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण मोडघरे तर प्रास्ताविक श्याम सवाई यानी केले आभार प्रदर्शन रविंद्र लोखंडे यांनी केले.