बसमधून प्रवास करताना प्रशासनाच्या वतीने काेराेना संसर्ग पाहता, खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच विना मास्क प्रवास काेणीही करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तरीही प्रवासी विना मास्क प्रवास करीत असून, त्यांना काेणत्याच प्रकारचा अटकाव केला जात नसल्याने, बस स्थानकातील प्रवाशांमधून काेराेना संसर्गाचा फैलाव हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसमध्ये चढताना अनेक प्रवासी आजही बसमध्ये चढताना एकच गर्दी करीत असल्याचे १९ फेब्रुवारी राेजी दिसून आले. विशेष म्हणजे, बस स्थानकात बसताना प्रवाशांकडून काेणत्याच प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन हाेताना दिसून येत नाही.
बस स्थानकाच्या भाेंग्यावर काेराेना संसर्ग असल्याने, वेळाेवळी भाेंग्यावरून प्रवाशांनी काेराेना नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करा, वेळाेवेळी हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना देण्यात येत आहेत, परंतु याकडे काेणीही लक्ष द्यायला तयार नाही.
बस स्थानकातील गर्दीमुळे काेराेनाबाधितांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, याबाबत प्रशासनाने ठाेस पावले उचलण्याची गरज असल्याचे बाेलले जात आहे.
..............
चालक-वाहकच मास्कविना
काेराेना संसर्ग पाहता, सर्वांनी मास्कचा वापर करावा, असे प्रशासनाने सांगितले असताना, अनेक बसमधील चालक, वाहकच मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता, गुदमरल्यासारखे हाेत असल्याचे सांगण्यात आले. वाहकच नियमांचे पालन करीत नसतील, तर प्रवाशांना नियम पाळण्याचे काेणी सांगावे, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.